Manoj Jarange । मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून सातव्यांदा उपोषणासाठी आमरण उपोषणाला बसले होते. आज सहाव्या दिवशी त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या हस्ते ज्यूस घेत राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात लवकरच निर्णय घेतला नाही तर पुढील आंदोलन मुंबईत करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लवकरच त्याबाबत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे समितीने जास्त किचकट अटी लावू नयेत, वंशावळ समिती पुन्हा एकदा गठीत करा, मराठा आंदोलकावर असणारे गुन्हे मागे घ्या. ओबीसीच्या वरचे नाही तर ओबीसीतून आरक्षण द्यावे. सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी झालीच पाहिजे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
“मनोज जरागे यांच्या उपोषणातून काय मिळाल? असे काही जण म्हणत आहेत. पण त्यांचा 24 घंटे एकच धंदा आहे, त्यांना काही करायचे नाही. राज्य सरकारने शिंदे समितीच्या मंत्रालयावरील ऑफिसला कुलूप लावलं होते. जे काय मिळालं म्हणत होते ना, घरात बसून नेत्यांचे पाय चाटणाऱ्यांना कळत नाही,” अशी चिमटा जरांगे पाटील यांनी बोलताना काढला आहे.
दरम्यान, कालच जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला होता. “मी आता उपोषण करणार नाही. मागील पावणे दोन वर्षे आंदोलन केली. मी आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहे,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Suresh Dhas यांनी अजित पवारांना दिलेल्या ‘त्या’ पेन ड्राईव्हमध्ये असं काय आहे? ज्यामुळे वाढू शकतात मुंडेंच्या अडचणी
- मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? Devendra Fadnavis यांनी अखेर स्पष्टच सांगितलं, म्हणाले….
- “4-5 जागांवरून अजित पवारांना कशा मिळाल्या 42 जागा?” विधानसभेच्या निकालावर Raj Thackeray पहिल्यांदाच बोलले