Share

आरोपी कृष्णा आंधळे सापडत नसल्याने Ajit Pawar यांनी दिला बीड पोलीस अधीक्षकांना दणका

by MHD
Ajit Pawar slapped Beed SP as the accused Krishna Andhale could not be found

Ajit Pawar । संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) 8 आरोपींना पोलिसांनी पकडले असून त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. परंतु, यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही पोलिसांना गुंगारा देत आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवीन एसपींना दणका दिला आहे.

“बीड जिल्ह्याची सूत्रे हातात घेऊन आपणाला एक महिना झाला तरी अजूनही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे का सापडत नाही? तुम्ही कुठे कमी पडत आहात? असे सवाल अजित पवारांनी बीडचे पोलीस अधीक्षक (Beed SP) नवनीत कॉवत (Navneet Kawt) यांना विचारला आहे.

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला 50 दिवस होऊन देखील कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरूनच आज बीड दौऱ्यावर असताना अजित पवारांनी कॉवत यांचा समाचार घेतला.

Ajit Pawar on Navneet Kawt

दरम्यान, जो कृष्णा आंधळे याचा ठावठिकाणा सांगेल त्याला बीड पोलीस बक्षीस देणार आहे. त्यामुळे आता कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती सापडतोय का? याकडे संतोष देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Since 50 days after Santosh Deshmukh’s murder, Krishna Andhale has not been found, Ajit Pawar has slapped the SP.

Crime Maharashtra Marathi News Politics