Share

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिली ‘ही’ ऑफर; त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…

Uddhav on Fadnavis’ offer: Slams Shinde, questions BJP ethics

Published On: 

uddhav thackeray and devendra fadnavis

प्रतिनिधी – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना सत्ताधारी बाकावर येण्याची थेट ऑफर दिली होती. “तुम्हाला इथे यायला स्कोप आहे. जर यायचे असल्यास त्याप्रमाणे विचार करता येईल,” असे फडणवीस म्हणाले होते. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, विधिमंडळातून बाहेर पडताना उद्धव ठाकरे यांनी या ‘ऑफर’वर आपली भूमिका स्पष्ट करत, शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली.

माध्यमांनी फडणवीसांच्या ऑफरबद्दल विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले, “हा प्रश्न नुसता बाकाचा नाही, तर प्रसंग बडा बाका आहे. सभागृहात काही गोष्टी खेळीमेळीने होत असतात. त्या खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात.” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे फडणवीसांच्या ‘राजकीय ऑफर’ला त्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र आहे.

Uddhav Thackeray on Fadnavis Offer

याचवेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या शिवसेनेशी आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या युतीवरूनही निशाणा साधला. आनंदराज आंबेडकरांनी युती करताना “मी अधूनमधून ऑपरेशन (राजकीय) करत असतो” असे विधान केले होते. याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, “ऑपरेशनचा माझ्याएवढा अनुभव त्यांना (एकनाथ शिंदे) नाही.”

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणालाही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी सडेतोड उत्तर दिले. शिंदे म्हणाले होते की, ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो हे माझ्या वडिलांची आणि आजोबांची पुण्याई आहे. पण ज्यांनी त्यांना (शिंदे) सोन्याच्या चमच्याने भरवले, त्या अन्नाशी त्यांनी प्रतारणा केली. हे पाप जनता विसरू शकणार नाही.”

नाशिकमध्ये भाजपने काही लोकांना पक्षात घेण्यासाठी त्यांच्यावरील आरोप माफ केल्याचा मुद्दाही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “१५ ते २० दिवसांपूर्वी ज्यांच्याविरोधात आरोप झाले होते, म्हणून त्यांना आम्ही पक्षातून काढले, त्याच लोकांना आरोप मागे घेऊन भाजपने पक्षात घेतले आहे. इतकी नीतीमत्ता खालावली असेल, तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही