Share

“एवढं होऊनही अजित पवारांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित…”; Jitendra Awhad यांचा घणाघात

by MHD
Jitendra Awhad criticizes Ajit Pawar over Dhananjay Munde resignation

Jitendra Awhad । संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी देखील मुंडेंना पाठिंबा दिला आहे.

‘ठोस पुरावे मिळाल्याशिवाय आपण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणार नाही’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कालच स्पष्ट केले. यावरून त्यांना आता विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

“पण हा माणूस नशीबवान आहे, सगळे होऊन सुद्धा अजित पवार छातीचा कोट करून उभे आहेत. मी किती कमनशिबी आहे. 2019  मंत्री झालो पालकमंत्रीसाठी चढाओढ सुरू झाली, मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते. पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे ३ आमदार आहेत. पण हट्ट धरून बसले आहेत पालघर घ्या, रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत.”

“सत्य देवाला माहीत पण मी काही पालक मंत्री होऊ शकलो नाही. मग मी साहेबांमुळे सोलापूरचा पालक मंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली आणि काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली दादा थोडे दिवस थांबले असते तर.. अश्या खूप जखमा आहेत, पण कधीच हिशोब दिला नाही की मी हे केले मी ते केले. 2004 ते 2014 जेव्हा कोणी उभे राहीला तयार नव्हते तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघड पणानी दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लवायचो पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन मीच करतो मीच करतो असे केले नाही. कदाचित दादांना हे वागणे आवडत असावे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Jitendra Awhad on Ajit Pawar

दरम्यान, या पोस्टद्वारे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे आपली दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर अजित पवार काय उत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Through the post, Jitendra Awhad has alleged that Ajit Pawar did not take notice of him like Dhananjay Munde. Therefore, Awhad post has sparked a discussion in the political circle.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now