Anjali Damania । राजकीय वर्तुळातून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आज भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी मुंडेंना पाठिंबा दिला आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“नामदेव शास्त्री यांना या प्रकरणाची पूर्ण कल्पना नाही. त्यांनी ते पेपर बघितले नाहीत. जे घोटाळे झाले आहेत ते त्यांनी पाहिले नाहीत. आपण कोणीच आरोप करत नाहीये. हाकिकत मांडतो असल्याने कदाचित ती नामदेव शास्त्रींना माहिती नसेल म्हणून त्यांनी मुंडेंना पाठिंबा दिला असेल,” असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “आमच्या काही जे सहकारी आहेत, त्यांच्यामार्फत नाहीतर, मी स्वतः भगवानगडावरती जाऊन त्यांना सर्व पेपर देणार आहे. येत्या दोन दिवसात म्हणजे कदाचित उद्या किंवा परवा मी याप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा करणार आहे. भगवानगड ते एक पवित्र स्थान आहे आणि त्याचा राजकारणासाठी धनंजय मुंडे वापर करून घेतला आहे. मुंडेंनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांना बोलायला भाग पाडायला नको होतं,” असे दमानिया म्हणाल्या आहेत.
Anjali Damania will meet Namdev Shastri Maharaj
दरम्यान, आता अंजली दमानिया नामदेव शास्त्री यांना कोणते पुरावे देणार? त्यावर नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा काढून घेतील का? अशा विविध चर्चांना राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यामुळे अंजली दमानिया आणि नामदेव शास्त्री यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :