Share

Santosh Deshmukh यांच्या प्रकरणातील आरोपींना आधी मारहाण झाली, म्हणून त्यांची मानसिकता बिघडली : महंत नामदेव शास्त्री

by MHD
Namdev Shastri Maharaj shocking statement regarding accused in Santosh Deshmukh murder case

Santosh Deshmukh । मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गुरुवारी रात्री उशिरा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांची भगवानगडावर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी आज धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे परंतु, त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींवरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

“ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली? याचा विचार केला पाहिजे. हत्या करणाऱ्यांना अगोदर मारहाण झाली होती. त्याचीही दखल घेण्याजोगी आहे. हे मीडियाने का दाखवलं नाही? हा विषय त्यांच्या मस्साजोग या गावातल्या बैठकीतला होता,” असे खळबळजनक वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले आहे.

“मी धनंजय मुंडे यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की तो मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आला आणि सर्व पक्षात त्याचे मित्र आहेत. परंतु, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे,” असा आरोप नामदेव शास्त्री यांनी केला आहे.

Namdev Shastri Maharaj on Santosh Deshmukh murder case

दरम्यान, धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आरोपींबाबत नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यावरून मोठी खळबळ उडाली आहे. जर भगवानगडावरचे महंतच आरोपींबाबत अशाप्रकारची वक्तव्य करत असतील तर सर्वसामान्यांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

The statement made by Namdev Shastri regarding the accused in Santosh Deshmukh murder case by supporting Dhananjay Munde has caused a lot of excitement.

Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now