Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या केल्याने संपूर्ण राज्याचे राजकीय चित्र बदलून गेले आहे. विरोधकांकडून सतत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी (Resignation demand of Dhananjay Munde) केली जात आहे. अशातच आज भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला.
यावरून देखील धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच आज माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा सततच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“53 दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियीवरून मला टार्गेट करून मीडिया ट्रायल चालवलं जात आहे. मंत्री झाल्यावर मी एकदाही भगवान गडावर आलो नव्हतो. काल रात्रीच मी भगवान गडावर आलो आहे. आज हा गड माझ्यापाठी भक्कमपणे उभा आहे. ही माझ्यासाठी मोठी शक्ती असून त्याचे वर्णन शब्दात सांगू शकत नाही,” असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
Dhananjay Munde on Santosh Deshmukh murder case
पुढे ते म्हणाले की, “सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. फास्ट ट्रॅकवर केस आणून त्यातील आरोपींना फाशी द्या. जे कोणी सापडेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, ही माझी पहिल्या दिवसांपासूनची भूमिका आहे. माझा राजीनामा घेण्यासाठी राजकारण सुरू आहे. माझा राजीनामा महत्वाचा की संतोष देशमुखांना न्याय देणं महत्वाचं आहे?” असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :