Dhananjay Munde । एकीकडे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे सततची राजीनाम्याची मागणी होत असताना मंत्री धनंजय मुंडे यांना आज भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा पेटले आहे.
इतकेच नाही तर नामदेव शास्त्री महाराज यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) आरोपींवरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली? याचा विचार केला पाहिजे. हत्या करणाऱ्यांना अगोदर मारहाण झाली होती. त्याचीही दखल घेण्याजोगी आहे. हे मीडियाने का दाखवलं नाही? हा विषय त्यांच्या मस्साजोग या गावातल्या बैठकीतला होता,” असे खळबळजनक वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले आहे.
यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड (Walmik Karad) वर निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर नामदेव शास्त्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Jitendra Awhad post on X
“डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरुण अशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. कधीकाळी आपण भगवानगड राजकारण्यापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती? आणि आज निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुण त्याचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या धनंजय मुंडे वाल्मिक कराड टोळीचे समर्थन करताय ही मनाला न पटणारी गोष्ट आहे.”
“शास्त्री महाराज आपल्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, पण आपण धनंजय मुडे वाल्मिक कराड टोळीची पाठराखण करणे हे भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे. धंनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारी आणि राक्षसी राजकीय महत्वकांक्षेसाठी उध्वस्त केलेल्या समाजातील लोकांची यादी देतोय, त्या सर्वांना आणि धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना भगवान गडावर समाजाची परीषद बोलावून समोरासमोर बसुन चर्चा घडवून आणा, म्हणजे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड हे किती मोठे संत आहेत हे संपुर्ण जगाला कळेल.”
ज्यांचे खुण झालेत असे….
१) मयत संगीत डिघोळे परळी यांचे कुटुंब
२) मयत काकासाहेब गर्जे परळी यांचे कुटुंब
३) मयत महादेव मुंडे परळी यांचे कुटुंब
४) मयत बापु आंधळे परळी यांचे कुटुंब
५) मयत बंडु मुंडे परळी यांचे कुटुंब
ज्यांच्यावर जिवघेणे हल्ले घडवुण आणले आहेत असे..
१) महादेव गित्ते परळी
२) सहदेव सातभाई परळी
३) राजाभाऊ नेहरकर परळी
ज्यानां खोट्या गुन्ह्यांत आडकवुन त्यांचे आयुष्य उध्वस्त केले असे…..
१) प्रा. शिवराज बांगर बीड
२) बबनभाऊ गित्ते परळी
३) रामक्रष्ण बांगर, विजयसिंह बांगर पाटोदा
४) करूणा धंनजय मुंडे परळी
५) प्रकाश मुंडे नाथ्रा परळी
६) राजाभाऊ फड परळी
“अशी खुप मोठी समाजातील लोकांची यादी आहे, (इतर समाजाची यादी जोडल्या ती फार मोठी होईल) ज्यांना घेवुन मी आपल्याकडे येतो, यांच्या वेदना आणि त्यांना वेदना देणारा कोण आहे? हे आपण महंत म्हणुन विचारणार का? धनंजय मुंडेच्या हाताला लावलेल्या सलाईनपेक्षा धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यामुळे अनाथ झालेली लेकरे, विधवा झालेल्या बायका, आपल्या पोटच्या मुलांन गमावून सतत डोळ्यातुन आसवे गाळणारे आई, बाप, यांनी घडवून आणलेल्या हल्ल्याने कायम आधु झालेले लोक, यांनी खोट्या गुन्ह्यांत आडकवल्या नंतर तुरुंगात खितपत पडलेले किंवा रानोमाळ भटकंती करणारे लोक यांचे दुःख फार मोठे आहे. महंत म्हणुन आपण हे दुःख समजावुण घेणार आहात का? सुदर्शन घुले, प्रतीक घुले, गोट्या गित्ते , धनराज फड, सुनिल फड, विष्णु चाटे, रघु फड, यांसारखे समाजातील शेकडो तरुण स्वताः च्या राजकीय फायद्यासाठी गुन्हेगार बनवलेत. त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था आहे?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
Jitendra Awhad on Namdev Shastri Maharaj
दरम्यान, नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. जर भगवानगडावरचे महंतच आरोपींबाबत अशाप्रकारची वक्तव्य करत असतील तर सर्वसामान्यांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- सततच्या राजीनाम्याच्या मागणीवरून Dhananjay Munde यांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले; “संतोष देशमुखांना न्याय देणं महत्वाचं का…”
- “गुंड थोडेच संप्रदाय चालवतात”, Manoj Jarange यांचे खळबळजनक विधान
- Santosh Deshmukh यांच्या प्रकरणातील आरोपींना आधी मारहाण झाली, म्हणून त्यांची मानसिकता बिघडली : महंत नामदेव शास्त्री