Dhananjay Munde । अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. आजच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
अशातच आता आमदार सुरेश धस यांच्यानंतर भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा थेट राजीनामाच मागितला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटले आहे.
“आपला सहकारी किंवा पार्टनर एखाद्या प्रकरणात अडकला असेल तर धनंजय मुंडे यांनी तातडीने बाजूला व्हायला पाहिजे होते. पण याउलट मुंडे हे कराडच्या परळी येथील कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेत आहे. याचा अर्थ असा होतो की मुंडे हे कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
Narendra Patil on Dhananjay Munde
“मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. जर त्यांनी राजीनामा दिला तर कुठलाही दबाव राहणार नाही. चौकशी चांगल्या पद्धतीने होईल आणि पारदर्शक होईल. या प्रकरणातील सत्यही लवकर बाहेर पडेल. प्रकरणातील सत्य बाहेर आले आणि तर निर्दोष असेल तर त्यांनी खुशाल परत मंत्रिपदाची शपथ घ्यावी,” असा सल्लाही पाटील यांनी मुंडेंना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :