Iswarya Ramanathan । देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी (UPSC). जर ही परीक्षा पास व्हायची असेल तर त्यासाठी दिवसरात्र कठीण परिश्रम घ्यावे लागतात. अनेकजण जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर या परीक्षेत यश मिळवतात.
याचीच प्रचिती सध्या तामिळनाडूच्या कुड्डालोर (Cuddalore) येथे आली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलीने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. ईश्वर्या रामनाथन असे यूपीएससी पास झालेल्या शेतकऱ्याच्या मुलीचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे ईश्वर्या रामनाथन यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी ही परीक्षा क्रॅक केली आहे.
ईश्वर्या रामनाथन यांनी एकदा नाही तर दोन वेळा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (UPSC Civil Services Exam) क्रॅक केली आहे. यासह ईश्वर्या रामनाथन यांचे नाव भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत जोडले गेले आहे. या कामगिरीमुळे त्यांचे सर्वस्तरावर कौतुक केले जात आहे.
कलेक्टर गगनदीप सिंह बेदी (Gagandeep Singh Bedi) त्यांचे प्रेरणास्थान आहे. ईश्वर्या रामनाथन यांचे वडील आर.रामनाथन (R. Ramanathan) हे शेतकरी आहेत. ईश्वर्या रामनाथन यांनी २०१७ मध्ये चेन्नईतील अण्णा विद्यापीठातून डिग्री पूर्ण करत कॉलेजमध्ये असतानाच यूपीएससी कोचिंग घेऊन नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली होती.
Ishwarya Ramanathan becomes IAS officer
त्यांना पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया ६३० रँक मिळाला होता. त्यामुळे त्यांची रेल्वेतील सेवेसाठी निवड झाली होती. त्यांनी २०१९ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया ४७ व्या रँकह यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- “भ्रष्ट राजकारण्यांच्या मदतीला धर्मसत्ता धावते तेव्हा खंडणीतला वाटा त्यांनाही मिळालेला असतो” – Nikhil Wagle
- मोठी बातमी! Santosh Deshmukh हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीला कोर्टाचा पुन्हा दणका
- Dhananjay Munde आणि Walmik Karad अशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन नामदेव शास्त्रींनी करणे अत्यंत दुर्दैवी : जितेंद्र आव्हाड