Share

१० वी, १२ वी च्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज, कडक अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

SSC and HSC exams | The SSC exams will be held from February 21 to March 17, 2025, while the HSC exams will take place from February 11 to March 18, 2025.

Published On: 

छत्रपती संभाजीनगर, दि.३१ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ( SSC and HSC exams ) होणार आहेत. या कालावधीत कॉपी मुक्त परीक्षा करण्यासाठी प्रशासन सज्ज असून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

यासंदर्भात झालेल्या बैठकीस जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी होते.

इयत्ता १० वीची परीक्षा दि.२१ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान असून इयत्ता १२ वी ची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्ह्यात इयत्ता १२ वी ची परीक्षा ६३ हजार ९७८ विद्यार्थी तर इयत्ता १० वी ची परीक्षा ६८ हजार २२३ विद्यार्थी देत आहेत. त्यासाठी एकूण ३९९ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले आहेत की, कॉपीमुक्त अभियानासंदर्भात,अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राची परीक्षेपूर्वी प्राथमिक तपासणी करावी.परीक्षा केंद्र सर्व भौतिकसुविधा युक्त असावे,परीक्षा केंद्र जवळील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद असतील, पोलीस बंदोबस्त तपासणीसाठी असेल.संवेदनशील केंद्रात अधिक पोलीस बंदोबस्त राहील, तालुका प्रशासनाने संपूर्ण तालुक्याचे विविध विभागातील अधिकारी यांची पथके करावीत व सर्व परीक्षा केंद्राना भेटी द्याव्यात,जिल्ह्यात कोणत्याही केंद्रात एकही कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी,प्रत्येक परीक्षा केंद्रावर बारीक लक्ष ठेवा,रिपोर्ट करा,तात्काळ कृती करा, वैयक्तिक,सामुहिक कॉपी होणार नाही, झाल्यास कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात येईल,कॉपी झाल्यास वा केल्यास शाळांची मंडळ मान्यता व शाळा मान्यता कायम स्वरुपी रद्द करण्यात येईल,परीक्षा नियंत्रण कक्ष व वॉर प्रत्येक परीक्षा केंद्राचे लाईव्ह नियंत्रण ठेवतील,असे निर्देश देण्यात आले आहे.

यासंदर्भात कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी शिक्षण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना लेखी पत्राद्वारे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनीही आवाहन केले असून सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना आदेशीत केले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाटकर यांनी केले.

The SSC and HSC exams 2025 time sheduled

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही