🕒 1 min read
Budget 2025 । आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा (Agriculture Budget) केल्या आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होईल.
शेतकऱ्यांसाठी केल्या या घोषणा
- कापसाच्या विविध जाती विकसित केल्या जाणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड दिली जाणार आहे.
- कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल.
- अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन केले जाईल.
- कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर केले असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवल्या जातील.
- बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना केली जाणार आहे.
- डाळींसाठी 6 वर्षांसाठी आत्मनिर्भरता योजना लागू केली जाणार आहे.
- फळ-भाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवली जाणार आहे.
- किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाख करण्यात आली आहे.
- पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवणार असून यात एकूण 100 जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
- यूरीया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात तीन कारखाने निर्माण केले जातील आणि याची मर्यादा 12.7 लाख मेट्रिक टन असेल.
- कृषी, आरोग्य इनोव्हेशनमध्ये एआय
Nirmala Sitharaman on Agriculture Budget 2025
दरम्यान, यंदाच्या अर्थंसंकल्पात शेतकऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वसामन्यांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प तयार केला आहे असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
- संतापजनक! Eknath Shinde यांच्या नेत्याच्या हत्येमागचं मोठं कारण आलं समोर, जाणून तुम्हालाही बसेल धक्का
- चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई होणार? Aditi Tatkare यांचं मोठं विधान, म्हणाल्या…
- महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा दिलासा! Gas cylinder च्या दरात पुन्हा घसरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







