Amitabh Bachchan । हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये (Hindi Film Industry) असे काही अभिनेते/ अभिनेत्या आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे असे काही चित्रपट आहेत जे आजपर्यंत कधीच रिलीज झाले नाहीत.
अमिताभ बच्चन यांच्या आलिशान (Aalishan) या चित्रपटाचे शुटींग एका आठवड्यासाठी चालले, परंतु नंतर हा चित्रपट अचानक थांबला. नंतर हा चित्रपट पूर्ण झाला नाही कारण इतर प्रकल्पांमुळे अमिताभ बच्चनला वेळ मिळाला नाही. या चित्रपटाचे बजेटही खूप मोठे होते.
अमिताभ बच्चन आणि रेखा (Rekha) हे बॉलिवूडची पहिल्या क्रमांकाची जोडी असल्याचे म्हटले जात होते. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु त्यांचा अपना पराया (Apna Paraya) हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नव्हता.
अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांनी एक था चंदेर एक थी सुधा (Ek Tha Chander Ek Thi Sudha) या चित्रपटात एकत्र काम केले होते, मात्र पैशांअभावी हा चित्रपट थांबवावा लागला होता.
परवीन बबी, कादर खान आणि शाकी कपूर यांनाही अमिताभ बच्चन यांचा सरफरोश (Sarfarosh) हा चित्रपटदेखील प्रदर्शित होऊ शकला नाही. काही कारणांमुळे तो बंद झाला होता. चित्रपट का बंद झाला याबद्दल माध्यमांमध्ये कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण दिले गेले नाही.
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन दोघेही ‘संकट’ (Sankat) चित्रपटात दिसणार होते. या चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरणही केले होते, पण नंतर काही कारणांमुळे तो चित्रपट थांबवण्यात आला.
रेखा, संजीव कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा ‘टायगर’ (Tiger) हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु चित्रपटाचे निर्माता आणि कलाकार यांच्यात काही मतभेद होते. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी बंद झाले.
Amitabh Bachchan Unreleased Movie
अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक सुजित सरकर ‘शुबाइट’ या चित्रपटात एकत्र काम करत होते. काही कायदेशीर अडचणींमुळे या चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या :