Share

“संतोष देशमुखांच्या मुलीच्या डोळ्यातील दुःख पाहा…”; Namdev Shastri वर दमानिया कडाडल्या

by MHD
Anjali Damania target Namdev Shastri for supporting Dhananjay Munde

Namdev Shastri । एकीकडे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावरून राज्याचे राजकीय वातावरण पेटले असताना आता यात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी मुंडेंना दिलेल्या पाठिंब्याची भर पडली आहे. नामदेव शास्त्री यांच्या निर्णयावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावरून दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दमानिया X वर लिहितात, “माननीय नामदेव शास्त्रींजी, आपण काल माध्यमांना दिलेली मुलाखत ऐकून वाईट वाटलं. आपण म्हणालात आपण धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिलेत, अंतःकरण पाहिलं आणि भगवान गडाकडून धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला. आम्ही स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यांच्या मुलांना भेटलो, त्यांना भेटल्यावर खूप अवस्थ वटलं. काय दोष होता ह्या भाबड्या जिवांचा? का वडलांचे छत हिरावून घेतलं गेलं यांचं? आम्हीत् यांचे पुरावे पाहिले. नंतर आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे आर्थिक व्यवहार शोधले, त्यांचे balance sheet पाहिले आणि केलेल्या दहशतीचे पुरावे पाहिले, बंदुकांचे फोटो पाहिले, वीडियो पाहिले.”

“मी एसपींना, ADG, DG, मुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना भेटले आणि मुंबई हाई कोर्टच्या चीफ जस्टिस यांना पुरावे सादर केले. दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ, धनंजय देशमुख आपल्याला उद्या भेटायला येणार आहेत त्यांच्या बरोबर मी हे पाठवत आहे. कृपया ते पहावे ही विनंती आणि वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतःकरणातील दुःख देखील आपण पाहावे ही नम्र विनंती,” असे दमानिया म्हणाल्या आहेत.

Anjali Damania React On Namdev Shastri support Dhananjay Munde

दरम्यान, याप्रकरणावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “नामदेव शास्त्री म्हणाले की या हत्येतील आरोपींची मानसिकता खराब झाली. पण त्यांच्याकडे सगळी माहिती नसल्यामुळे ते असे म्हणाले. आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल? आमची लेकरे पोरकी झाली आहेत. माझा भाऊ गेला आहे. आई-वडील म्हातारे झाले आहेत. आता आम्ही काय करायचे? आमचा भाऊ परत कुठून आणायचा? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Namdev Shastri । एकीकडे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावरून राज्याचे राजकीय वातावरण पेटले असताना आता यात भगवान गडाचे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News