Share

“…अन् वाल्ह्याचा वाल्मिक करून गेले”; फडणवीसांचे विश्वासू Sadabhau Khot यांची मुंडे, शास्त्रींवर टीकास्त्र

by MHD
Sadabhau Khot target Namdev Shastri and Dhananjay Munde

Sadabhau Khot । मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पाठिंबा दिल्याने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) हे टीकेचे धनी होऊ लागले आहे. त्यांच्या निर्णयाचा राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वर्तुळ पेटले आहे.

“रयतेला चार दिवस सुखाचे मिळावेत, त्यांनी गुण्यागोविंदाने राहावे. असे संदेश देणारे संत तुकोबा कुठे आणि दुसऱ्या बाजूला हे संत कुठे? राजकारणाचं गुन्हेगारीकरण करायचे आहे का? यशवंतराव साहेबांच्या काळामध्ये गुन्हेगारीला आसरा नव्हता. पण अलीकडच्या काळामध्ये धनदांडग्यांचे राजकारण सुरु झाले आहे. ते राजकारण गुन्हेगारीच्या आश्रयाखाली वावरायला लागले. इंडियावादी संत जन्मले अन् वाल्ह्याचा वाल्मिक(Walmik Karad) करून गेले,” असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू तथा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

Sadabhau Khot post on X

तसेच सदाभाऊ खोत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर देखील ट्विट केले आहे. खोत X वर लिहितात, “धनंजय मुंडे 100% गुन्हेगार नाही. इतका त्रास सहन करणारा आमच्या क्षेत्रात संत झाला असता – नामदेवशास्त्री महाराज

भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी I
संत तुकोबांची ही वाणी गाव गाड्याला बळ देऊन जाई.
इंडिया वादी संत जन्मले, वाल्ह्याचा वाल्मीक करून गेले.”

दरम्यान, याप्रकरणावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “नामदेव शास्त्री म्हणाले की या हत्येतील आरोपींची मानसिकता खराब झाली. पण त्यांच्याकडे सगळी माहिती नसल्यामुळे ते असे म्हणाले. आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल? आमची लेकरे पोरकी झाली आहेत. माझा भाऊ गेला आहे. आई-वडील म्हातारे झाले आहेत. आता आम्ही काय करायचे? आमचा भाऊ परत कुठून आणायचा? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Sadabhau Khot on Namdev Shastri and Dhananjay Munde

नामदेव शास्त्री यांना सर्वस्तरातून टीकेचा सामना करावा लागत आहे. लवकरच धनंजय देशमुख भगवानगडावर जाऊन आरोपींच्या विरोधातले पुरावे नामदेव शास्त्री यांना दाखवणार आहेत. यावर नामदेव शास्त्री कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Sadabhau Khot । मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पाठिंबा दिल्याने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) हे टीकेचे धनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD