Namdev Shastri । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे तर इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
अशातच काल संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर जाऊन भेट घेतली. देशमुख कुटुंबीय आणि नामदेव शास्त्री यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यावेळी प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत असल्याचे धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी नामदेव शास्त्री यांना सांगितले.
तसेच या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर कोणत्या स्वरूपाचे किती गुन्हे आहेत याची कुंडलीच धनंजय देशमुख यांनी पुराव्यानिशी मांडली. हे सर्व पाहून नामदेव शास्त्रीदेखील थक्क झाले होते. “तुम्ही एक बाजू ऐकून बोलला आहात तर आता दुसरी बाजूही तुम्हाला समजावी यासाठीच आम्ही इथे आलो असून आम्हाला न्याय द्या,” अशी मागणी वैभवी देशमुखने (Vaibhavi Deshmukh) केली.
Namdev Shastri Support Santosh Deshmukh Family
यावर नामदेव शास्त्री यांनी मोठा निर्णय घेतला आहे. “या प्रकरणातील आरोपींना आम्ही माफ करणार नाही. भगवान बाबांच्या गादीवर बसून आम्ही तुम्हाला शब्द देतो की देशमुख कुटुंबीयांच्या मागे भगवानगड सदैव राहील, अशी ग्वाही नामदेव शास्त्री यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या :