Share

धनंजय मुंडे यांचा राजीनामा निश्चित? Anjali Damania करणार मोठा खुलासा

Anjali Damania । संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच त्या पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करणार आहेत. “भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा आहे. मागील 4 दिवस त्याच्यावर काम केलं आहे. हे सगळे पुरावे अतिशय … Read more

by MHD

Published On: 

Anjali Damania will reveal about Dhananjay Munde in press conference

Anjali Damania । संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच त्या पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करणार आहेत.

“भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा आहे. मागील 4 दिवस त्याच्यावर काम केलं आहे. हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत, ते जनतेपुढे येतील. त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल,” असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

तसेच त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांच्यावरही टीका केली. “त्यांनी धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले आणि त्यांनी त्यांचं अंत:करण बघितलं, पण वैभवीचे डोळे कोण पाहणार? तिच्या डोळ्यातलं पाणी कोण बघणारं? राजकारणासाठी त्यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला”, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

Anjali Damania vs Dhananjay Munde

दरम्यान, 11 वाजता अंजली दमानिया पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी दमानिया कोणता खुलासा करणार याकडे संपूर्ण राज्यासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. तसेच हे पुरावे पाहून सरकार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विचार करणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही