Share

Dhananjay Munde यांची पाठराखण नामदेव शास्त्रींच्या अंगलट? मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ

Namdev Shastri यांनी Dhananjay Munde यांची केलेली पाठराखण त्यांच्या चांगलीच अंगलट येत आहे. राज्यभर शास्त्रींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. स्वर्गवासी देशमुख आणि त्यांच्या आरोपी याबद्दलही तिरकस टिपणी केली. त्यांच्या या टिपणीबद्दल राज्यभरातून सर्व समाजातून शास्त्रीवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. यामुळे ते चांगलेच टिकेचे धनी झाले आहेत.

Published On: 

Dhananjay Munde namdev shastri santosh deshmukh murder case

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर | राजेभाऊ मोगल | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा, म्हणून मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांचा राजीनाम्यासाठी राज्यभरातुन मोठा दबाव निर्माण झालेला आहे. मात्र, राष्ट्रीय नेते अजित पवार अध्याप गंभीर नसल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, कोंडी झाल्याने मुंडे राजीनामा टाळण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून मुंडेंनी भगवानगडावर मुक्काम केला. त्यानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांची केलेली पाठराखण त्यांच्या चांगलीच अंगलट येत आहे. राज्यभर शास्त्रींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत वाईट पध्दतीने हत्या करण्यात आली. या प्रकारानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. मात्र, मोठा अवधी लोटल्यानंतर, लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर सत्ताधारी, विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर जाग आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी एक -एक करून आरोपी उचलले. मात्र, यातील कृष्णा आंधळे नावाचा आरोपी 55 दिवसानंतरही फरारच आहे.

Namdev Shastri Support Dhananjay Munde

दरम्यान, या हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी, सूत्रधार हा वाल्मीक कराड असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी सभागृहात केला. असे असताना कराड यास खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करून आत टाकले आहे. मोठा दबाव असतानाही कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा व्यवसायिक भागीदार असल्याने अजूनही देशमुख यांच्या हत्या प्रकरणात थेट गंभीर स्वरूपाची गुन्हे त्याच्यावर दाखल नाहीत, असा आरोप सतत केला जात आहे.

या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा, यासाठी मंत्री मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, त्यांचे राष्ट्रीय नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याने त्यांच्यावरही टीका केली जात आहे. राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याने शेवटचा पर्याय म्हणून मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी भगवानगड येथे मुक्काम केला. यावेळी त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यानंतर नामदेव शास्त्री यांनी माध्यमांसमोर येत मुंडे यांच्या पाठीमागे भगवानगड भक्कमपणे उभा आहे.

स्वर्गवासी देशमुख आणि त्यांच्या आरोपी याबद्दलही तिरकस टिपणी केली. त्यांच्या या टिपणीबद्दल, मुंडे यांची पाठराखण केल्याबद्दल मागील दोन दिवसांपासून राज्यभरातून सर्व समाजातून शास्त्रीवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. यामुळे ते चांगलेच टिकेचे धनी झाले आहेत. त्यांच्या परदेश वाऱ्या, त्यांचा महागडा पेहराव, त्यांचा विमान प्रवास, त्यांचं वागणं यावर लोकांनी बोट ठेवले आहे. त्यांनी केलेली ही पाठराखण त्यांच्यात चांगलीच अंगलट आली आहे. असं चित्र पाहायला मिळत आहे.

या अनुषंगाने काही दूरचित्र वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी त्यांना नीटपणे उत्तरही देता आली नाहीत. ‘मुंबईतक’वर पत्रकार, निवेदक अनुजा धाक्रस हिने घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी उत्तरे देता येत आणल्याने शास्त्रींनी उठून जाणे पसंत केले. यावरूनच त्यांची कशी कोंडी झाली हे बघायला मिळत आहे. थोडक्यात काय तर लोकांनी या नामदेव शास्त्री यांचा बाजार उठवला आहे.

NamdevShatri | Dhananjay Munde पाठराखण शास्त्रींच्या अंगलट येणार?

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)