Share

महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही BJP चा डंका, ‘इतक्या’ मतांनी घेतली आघाडी

by MHD
BJP take leads on 45 seats in Delhi Election 2025

BJP । आज दिल्लीतील एकूण 70 जागांसाठीच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल (Delhi Election Result 2025) जाहीर होत असून ही निवडणुक माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस (Congress) साठी प्रतिष्ठेचा विषय मानली जात आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.

गेल्या 27 वर्षांपासून भाजपला दिल्लीत सत्ता मिळवता आली नाही. (Delhi Election) परंतु, आता भाजपा 45 तर आप 25 जागांवर आघाडीवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

दिल्लीकरांचा कल भाजपकडे झुकत असल्याने दिल्लीकर आता कारभार सोपवणार भाजपकडे सोपवणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे. दिल्लीमध्ये 13 टक्के मुस्लीम मतदार आहेत. यापूर्वी पाच जागांवर मुस्लीम आमदार देखील निवडून आले आहेत. परंतु, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दिल्लीतील मुस्लिम बहुल जागांवर मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.

Delhi Election Result

दिल्लीमधील सीलमपूर, मटिया महल, मुस्तफाबाद, बल्लीमारन आणि ओखला या जागांवर भाजप सोडून सर्व पक्षांचे मुस्लीम उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. असे असले तरी निकालाचे आकडे पाहून अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. जर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस ही निवडणूक एकत्र लढले असते, तर दिल्लीकरांचे या आघाडीच्या पारड्यात पडले असते.

महत्त्वाच्या बातम्या :

दिल्लीकरांचा कल BJP कडे झुकत असल्याने दिल्लीकर आता कारभार सोपवणार भाजपकडे सोपवणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.

Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now