Rahul Dravid। अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलची (IPL) चाहत्यांना आतापासूनच आतुरता लागली आहे. यंदा 18 व्या हंगामात कोणता संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता आयपीएल सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) यांचा राजस्थान रॉयल्समध्ये फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सहभाग होणार आहे. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वी म्हणजे 2018 -2021 पर्यंत या संघासोबत काम केले आहे. आता पुन्हा ते राजस्थान रॉयल्ससाठी काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. (IPL 2025)
साईराज बहुतुले हे न्यूझीलंडचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड (Shane Bond) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत काम करणार आहेत. इतकेच नाही तर राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांनी त्यांच्यासोबत काम केले आहे.
दरम्यान, साईराज बहुतुले हे मागील तीन वर्षांपासून बेंगलुरू येथे नॅशनल क्रिकेट अकॅडमी (एनसीए) येथे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होते. नुकताच त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला आहे. अनेक वेळा त्यांनी माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आहे. तसेच साईराज बहुतुले यांनी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले.
Rajasthan Royals IPL 2025
आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्स संघ
संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महेश थीकशन, वानिंदू हसरंगा, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, युद्धवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, कुणाल राठोड, अशोक शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या :