Share

संतोष देशमुखांची हत्या यांनीच केली; Karuna Munde यांचा मोठा गौप्यस्फोट

by MHD
Karuna Munde claimed that Walmik Karad killed Santosh Deshmukh

Karuna Munde । संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh murder case) करून दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. राजकीय नेतेदेखील त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. अशातच आता करुणा मुंडे यांनी देशमुखांच्या हत्येबाबत मोठा खुलासा केला आहे.

“वाल्मिक कराड (Walmik Karad) यानेच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली, हा आरोप नाही तर सत्यता आहे. ज्यावेळी देशमुखांनी पाणी मागितले त्यावेळी या गुंडांनी त्यांच्या तोंडामध्ये बाथरुम केली,” असा धक्कादायक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.

“जर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना महिलांबद्दल सहानुभूती असेल तर त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिमंडळातून हकलून लावले पाहिजे. पक्षाचा आधार घेत ही मोठं झालेली आहेत. वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे यांच्या पोटाचे पाणी हलत नाही, पंकजा मुंडे देखील म्हणाल्या होत्या. तसेच अजित पवार आणि फडणवीसांचे धनंजय मुंडेंशिवाय पोटाचे पाणी हलत नाही,” असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.

Karuna Munde on Dhananjay Munde

दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार काय बोलतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच याप्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया महत्त्वाची असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Karuna Munde यांनी संतोष देशमुखांच्या हत्येबाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now