Sujay Vikhe Patil । बिबट्याचं नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत चालली आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्यांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले हल्ले थांबवण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
त्यामुळे भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील आक्रमक झाले आहेत. बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी आता विखे पाटील मैदानात उतरले आहेत. ते आता थेट बिबट्यांना मारण्यासाठी कोर्टाचा (Court) दरवाजा ठोठावणार आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“बिबट्या माणसांना मारू शकतो, पण माणसांना बिबट्याला मारण्याची परवानगी नाही. बिबट्यांची संख्या हजारोंनी वाढली असून आता या संदर्भात बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी यासाठी मी लवकरच न्यायालयात जनहित याचिका (Public Interest Litigation) दाखल करणार आहे. मी यावर अभ्यास करत असून वकिलांचा सल्ला घेऊन लवकरच न्यायालयात जाईल,” असा दावा सुजय विखे पाटील यांनी केले आहेत.
Sujay Vikhe Patil on leopards attack
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुजय विखे पाटील यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले होते. “शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयामध्ये मोफत भोजन दिले जात असून संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करत आहे. संपूर्ण राज्यातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. त्यामुळे साई संस्थानच्या प्रसादालयात दिले जाणारे मोफत जेवण बंद करून जेवणासाठी पैसे घ्या,” अशी मागणी विखे पाटील यांनी केले होती. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :