Anjali Damania । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजीनाम्याच्या मागणीवरून सळो की पळो करून सोडले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण दररोज दमानिया या मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागत आहेत.
अनेकदा त्यांनी मुंडे यांच्या विरोधात पुरावे सादर करण्यासाठी पत्रकारपरिषद घेतली आहे. इतकेच नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही मुंडेंविरोधात पुरावे दिले आहेत. परंतु, अजूनही मुंडेंचा राजीनामा अजित पवारांनी घेतला नाही. यामुळे अजित पवार यांच्यावर विरोधक देखील टीका करत आहेत.
काही दिवसांपूर्वी पत्रकारपरिषद घेत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदीत तब्बल २७५ कोटींचा घोटाळा केला असल्याचा दावा केला होता. अशातच आता दमानिया यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर घोटाळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. (Anjali Damania vs Dhananjay Munde)
अंजली दमानिया X वर लिहितात, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कृषी घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा हा सगळ्यात मोठा पुरावा! MAIDC स्वतः बैटरी पम्प ₹ २१९० /-रुपयाने खरेदी करत होते. GST सकट. ₹ २४५३ /- ला पडत होते मग धनंजय मुंडेंनी ₹ ३४२५/- ला का घेतले? ह्याचे उत्तर मिळालेच पाहिजे,” अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
Anjali Damania on Dhananjay Munde
यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे. दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्यावरून निशाणा साधला आहे. यावर धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :