Rahul Gandhi । गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे विरोधक सरकारवर ईव्हीएमच्या (EVM) गडबडीचा आरोप करत आहेत. यावरून आज खासदार राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारपरिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोट ठेवले.
“राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाली आहे. कारण राज्याची लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख आहे. मग मतदार त्यापेक्षा जास्त कसे झाले? निवडणुकीपूर्वी इतक्या मतदारांची भर कशी पडली? आम्ही याचा सखोल अभ्यास केला असून यामध्ये आम्हाला अनेक तफावत दिसून आली आहे,” असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
“ज्या मतदारांची नावे वगळली त्यामध्ये दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजाचा समावेश आहे. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला विचारले असून पण त्यांनी आजपर्यंत काहीच उत्तर दिले नाही. यावरून काहीतरी गडबड झाली आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
Rahul Gandhi on Maharashtra Election 2024
पुढे ते म्हणाले की, “आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाही पण आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी नाव, पत्ता आणि फोटोसह निवडणूक आयोगाकडून देण्यात यावी. ही सर्व माहिती देणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. जर याबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही तर कोर्टात जाणार आहे. कारण महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळली आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :