Share

“शिंदे गट भाजपच्या पोटातील अपेंडिक्सची गाठ”; Sanjay Raut यांची बोचरी टीका

Sanjay Raut यांनी राज्यात ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या चर्चांवरून आज पत्रकारपरिषदेमध्ये भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

by MHD

Published On: 

Sanjay raut criticise BJP and shinde group on operation tiger

🕒 1 min read

Sanjay Raut । शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राज्यात ऑपरेशन टायगर (Operation Tiger) होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा जोर धरू लागला आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

“ते कसले ऑपरेशन करणार आहेत. रोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांचे ऑपरेशन करत असतात. त्यामुळे त्यांचा रोज अपमान होत आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स असून तो कधीही कापून टाकला जाऊ शकतो. आमचे ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या ॲपेंडिक्सचे ऑपरेशन हे फडणवीस करत असल्याने तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यातल्या ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटातील अनेकजण आमच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. यावर आज ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश आष्टीकर, अरविंद सावंत, अनिल देशाई, संजय जाधव आणि संजय देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली.

Sanjay Raut on Operation Tiger

“आतापर्यंत आम्हाला कुणाचाही फोन आला नाही. आम्हाला फोन आल्याच्या बातम्या या खोट्या आहेत. कितीही चढउतार होऊ द्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे. ज्यांचे सरकारमध्ये गंभीर वाद सुरू आहे त्यातून चर्चा दुसरीकडे वळवण्यासाठी कुणी तरी पुडी सोडली आहे,” असे अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)