Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरणी अंजली दमानियांचा संतप्त सवाल, म्हणाल्या; “अजून किती वेळ…”

by MHD
Anjali Damania statement on Santosh Deshmukh murder case

Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे (Santosh Deshmukh murder case) बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. याप्रकरणाला जवळपास दोन महिने पूर्ण होत आली तरी यातील एक आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही पोलिसांना गुंगारा देण्यास यशस्वी होत आहे.

बीड हत्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने त्या मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत विविध पुरावे सादर करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच आता त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली आहे.

अंजली दमानिया X वर लिहितात, “9 डिसेंबरला एका काळ्या स्कॉर्पिओ गाडीत संतोष देशमुख यांच्या हत्यारांचा गाडीत 2 फोन सापडले होते. ते forensic मध्ये, data recovery साठी पाठवण्यात आले आहेत असे सांगण्यात आले होते. आज 58 दिवस झाले. अजून किती वेळ काढणार आहात?,” असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

Anjali Damania on Santosh Deshmukh murder case

दरम्यान, या हत्याप्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक खुलासे देखील याप्रकरणी झाले आहेत. इतकेच नाही तर अटक केलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई देखील सुरु आहे. परंतु, अजूनही संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही. त्यांचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेतच आहे. त्यामुळे देशमुखांना न्याय कधी मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Santosh Deshmukh हत्याप्रकरणाला दोन महिने पूर्ण होत आली तरीही अजून त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेतच आहे. यावर जून किती वेळ काढणार आहात?,” असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी विचारला

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now