🕒 1 min read
SSC HSC Exam । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी (SSC exam) आणि बारावीच्या परीक्षा (HSC exam) घेण्यात येतात. यावर्षीच्या होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक (SSC HSC Exam Timetable) www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. (SSC HSC Exam 2025)
परंतु, काही विद्यार्थी परीक्षेत कॉपी करून पास होतात. यंदा मात्र कॉपी बहाद्दरांना आळा बसणार आहे. कारण दहावी आणि बारावीच्या परिक्षा कॉपी मुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न असून विशेष त्यासाठी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आले आहे.
विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हा (Criminal offence) दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. त्यामुळे कॉपी करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
तसेच या विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. आता जरी विद्यार्थ्याकडे हॉल तिकीट नसेल तरी त्याला परिक्षेला बसता येणार आहे. त्यांच्याकडून हमी पत्र घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांना हॉल तिकीट आणावे लागणार आहे. शिवाय परिक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी निर्देश दिले आहेत की, कॉपीमुक्त अभियानासंदर्भात, अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राची परीक्षेपूर्वी प्राथमिक तपासणी करावी.परीक्षा केंद्र सर्व भौतिकसुविधा युक्त असावे. परीक्षा केंद्र जवळील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद असतील, पोलीस बंदोबस्त तपासणीसाठी असेल.
संवेदनशील केंद्रात अधिक पोलीस बंदोबस्त राहील, तालुका प्रशासनाने संपूर्ण तालुक्याचे विविध विभागातील अधिकारी यांची पथके करावीत व सर्व परीक्षा केंद्राना भेटी द्याव्यात,जिल्ह्यात कोणत्याही केंद्रात एकही कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी,प्रत्येक परीक्षा केंद्रावर बारीक लक्ष ठेवा,रिपोर्ट करा. तात्काळ कृती करा, वैयक्तिक,सामुहिक कॉपी होणार नाही. झाल्यास कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात येईल. कॉपी झाल्यास वा केल्यास शाळांची मंडळ मान्यता व शाळा मान्यता कायम स्वरुपी रद्द करण्यात येईल. परीक्षा नियंत्रण कक्ष व वॉर प्रत्येक परीक्षा केंद्राचे लाईव्ह नियंत्रण ठेवतील, असे निर्देश देण्यात आले आहे.
SSC HSC EXAM SCHEDULED
असा असेल लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी
- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.बारावी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि १८ मार्च २०२५
- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५
- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.दहावी) परीक्षा – शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५
- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५
महत्त्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh हत्याप्रकरणी अंजली दमानियांचा संतप्त सवाल, म्हणाल्या; “अजून किती वेळ…”
- High blood pressure । तुम्हालाही आहे का उच्च रक्तदाबाचा त्रास? व्यायाम करताना विशेष काळजी, नाहीतर…
- Sonu Sood च्या अडचणी वाढल्या! न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी, जाणून घ्या नेमकं प्रकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












