Share

वाहनचालकांना मोठा दिलासा! सतत करावा लागणार नाही FASTag रिचार्ज, कसं ते जाणून घ्या

by MHD
Government FASTag Recharge Policy for Annual Pass

FASTag । राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (National Highway Authority) सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. टोल प्लाझावरील वाहनांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगापासून सुटका करण्यासाठी ही योजना आणली आहे. फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर असून तो गाडीच्या समोरच्या काचेवर लावण्यात येते. RFID या तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. तंत्रज्ञानाच्या मदतीने टोलवरील कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करून फास्टटॅग खात्यातून टोलची रक्कम वजा होते. (Toll tax rule)

सरकार आता फास्टटॅगबाबत एक नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या नियमामुळे महामार्गांवर वाहनांच्या लांबच रांगा लागणार नाहीत. तसेच फास्टॅग कार्डचा सतत रिचार्ज करावा लागणार नाही. लवकरच सरकार खाजगी वाहनांसाठी टोल पास सुरू करण्याची तयारी करत आहे.

जर हा टोल पास आला तर वाहनचालकांना वर्षातून एकदा 3000 रुपये देऊन कुठेही प्रवास करता येईल. केंद्र सरकारने संपूर्ण वर्षासाठी वन-टाइम पेमेंटद्वारे टोल पास बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. सरकार केवळ एका वर्षासाठी नाही तर लाइफटाइम टोल पास सुरू करण्याच्या तयारीत आहे.

New FASTag Policy

यासह, जर तुम्ही 30000 रुपयांचे वन-टाइम पेमेंट केले तर तुमचा 15 वर्षांसाठी टोल पास तयार होईल. सरकार या टोल पास नियमाद्वारे टोल वसुली सुलभ करू इच्छित आहे. दरम्यान, मागील महिन्यात रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सरकार खाजगी वाहनांकडून टोल वसूल करण्यासाठी मासिक आणि वार्षिक टोल पासची सुविधा देऊ शकते, अशी माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

सरकार FASTag बाबत एक नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या नियमामुळे महामार्गांवर वाहनांच्या लांबच रांगा लागणार नाहीत.

Maharashtra Cars And Bike Marathi News Technology

Join WhatsApp

Join Now
by MHD