IPL 2025 Schedule । 18 व्या हंगामात कोणती आयपीएलची (IPL) टीम ट्रॉफी जिंकणार? याकडे सर्वांच्या नजरा आतापासून लागल्या आहेत. त्यापूर्वी या हंगामाचे वेळापत्रक (IPL Timetable in 2025) कधी जाहीर होणार? असा सवाल चाहत्यांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
लवकरच आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या लिलावामध्ये इंग्लंडचा विकेटकीपर, फलंदाज जोस बटलर (Jos Butler) सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. तो गुजरात टायटन्सने 15.75 रुपये किंमतीत विकत घेतला आहे. तर सर्वात महागडा भारतीय खेळाडू विकेटकीपर, फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आहे. त्याला 27 कोटी रुपये म्हणून लखनऊ सुपर जायंट्सने विकत घेतले आहे.
आयपीएल 2025 मधील सर्वात जुना खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) होय. तो 43 वर्षांचा असून सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी आहे. तो केवळ 13 वर्षांचा आहे. त्याला आयपीएल 2025 च्या लिलावात, राजस्थान रॉयल्सने (RR) त्याला 1.10 रुपये किंमतीत खरेदी केले आहे.
आयपीएलच्या नवीन हंगामात अंतिम सामन्यांसह एकूण 74 सामने खेळले जाणार आहे. तर ईडन गार्डनमधील पहिल्या सामन्याशिवाय आयपीएल 2025 ची अंतिम फेरी 25 मे रोजी होणार आहेत. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर दोन प्ले-ऑफ सामने खेळवले जाणार आहेत.
आयपीएलची सुरुवात 21 मार्चपासून सुरू असून काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या तारखेची पुष्टी केली. पहिला सामना 21 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डनमध्ये खेळला जाईल.
IPL Schedule In 2025
IPL 2025 संघ आणि कर्णधार | IPL 2025 Schedule
IPL वेळापत्रक 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या संघांची आणि कर्णधारांची यादी खाली दिली आहे.
SR क्र | आयपीएल संघ | आयपीएल संघाचा कर्णधार |
1 | चेन्नई सुपर किंग्स (CSK) | ऋतुराज गायकवाड |
2 | मुंबई इंडियन्स | हार्दिक पांड्या ( बदलू शकतो ) |
3 | राजस्थान रॉयल्स | संजू सॅमसन |
4 | कोलकाता नाईट्स रायडर्स | |
5 | पंजाब किंग्ज | श्रेयस अय्यर |
6 | सनरायझर्स हैदराबाद | पॅट कमिन्स |
7 | दिल्ली कॅपिटल्स | सिकंदर रजा |
8 | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | |
9 | लखनौ सुपर जायंट्स | रिषभ पंत |
10 | गुजरात टायटन्स | रशीद खान |
आयपीएल 2025 ची ठिकाणे | IPL 2025 Venues | Tata IPL 2025 Teams Home Ground
शहर | स्टेडियम | होम टीम |
मुंबई | वानखेडे स्टेडियम | मुंबई इंडियन्स (MI) |
चेन्नई | एमए चिदंबरम स्टेडियम | चेन्नई सुपर किंग्स (CSK) |
कोलकाता | ईडन गार्डन्स | कोलकाता नाइट रायडर्स (KKR) |
दिल्ली | अरुण जेटली स्टेडियम | दिल्ली कॅपिटल्स (DC) |
बेंगळुरू | एम. चिन्नास्वामी स्टेडियम | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) |
हैदराबाद | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम | सनरायझर्स हैदराबाद (SRH) |
अहमदाबाद | नरेंद्र मोदी स्टेडियम | गुजरात टायटन्स |
जयपूर | सवाई मानसिंग स्टेडियम | राजस्थान रॉयल्स (RR) |
मोहाली | पीसीए स्टेडियम | पंजाब किंग्स (PBKS) |
लखनौ | एकना क्रिकेट स्टेडियम | लखनौ सुपर जायंट्स (LSG) |
महत्त्वाच्या बातम्या :