Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरणातील आरोपींच्या अडचणीत वाढ? विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये मिळाली महत्त्वाची माहिती

by MHD
Important information found in Vishnu Chate mobile phone in Santosh Deshmukh murder case

Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला (Santosh Deshmukh murder case) दोन महिने पूर्ण होत आली तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा अजूनही फरारच आहे. अशातच आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

या हत्याप्रकरणात अटकेत असणारा आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे. इतकेच नाही तर विष्णू चाटे (Vishnu Chate) याच्या देखील मोबाईलमधील डेटा सीआयडीने शोधला आहे. त्याच्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली आहे, अशी माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी दिली आहे.

तपासामध्ये गोपनीयता पाळायची असल्याने ती माहिती दिली जात नाही, असा खुलासाही धनंजय देशमुख यांनी केला आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मोठी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Murder Case

संतोष आण्णा देशमुख यांना न्याय देताना ज्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर दिली आहे. दरम्यान, विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली असल्याने आरोपींच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Santosh Deshmukh हत्याप्रकरणातील आरोपींच्या अडचणीत वाढ झाली असे बोलले जात आहे, कारण विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now