Manoj Jarange Patil । आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. परंतु, आज पत्रकारपरिषद घेत त्यांनी राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. (Maratha reservation)
“ही शेवटची लढाई आम्ही लढणार आहे आणि ही लढाई आम्ही जिंकणार आहे. उपोषण सोडले त्यादिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याजवळ आमच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या जातील, असा निरोप दिला होता. परंतु, आज 12 दिवस होऊनही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत,” असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
“शिंदे समिती गठीत केली नाही. वंशावळ समिती गठीत केली नाही. मनुष्यबळ वाढवून दिले नाही. मराठा आंदोलकांवरील एकही केस मागे घेतली नाही. आमची सरकारने एकही मागणी मान्य केली नाही. गोड बोलून उपोषण मागे घ्यायला लावायचे आणि नंतर एकही मागणी मान्य करायची नाही. सरकार जाणूनबुजून फसवणूक करत आहे,” असा आरोप जरांगे यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil on Maratha reservation
येत्या 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत साखळी उपोषण (Manoj Jarange Patil strike for Maratha reservation) केले जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारवर चांगलेच संतापल्याचे पाहायला दिसत आहे. निदान यावेळी तरी सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणार का? याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :