Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात जोरदार मागणी होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकीय दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
तसेच भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या सातत्याने त्यांच्या विरोधात पुरावे सादर करत त्यांचा राजीनामा मागत आहेत. यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच आता यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
“पक्षाच्या हिताचा विचार करुन लवकरच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर योग्य निर्णय घेऊ,” असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी केले आहे. तटकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्ष धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Sunil Tatkare on Dhananjay Munde
“संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. या हत्येमागचा मास्टरमाइंड शोधून काढावा ही आमची मागणी आहे .तपासासाठी तीन समित्या नेमल्या असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. कृषी घोटाळ्याचा सरकारकडून तपास सुरु आहे,” अशीही माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :