Share

Devendra Fadnavis यांनी अचानक घेतली राज ठाकरेंची भेट, कारण अद्याप अस्पष्ट

by MHD
Devendra Fadnavis suddenly meets Raj Thackeray

Devendra Fadnavis । राजकीय वर्तुळात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. कारण २०१९ पासून राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे.

फडणवीस हे ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या भेटीचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु, आगामी पालिका निवडणुका तोंडावर असल्याने ही भेट महत्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवाजी पार्कवरील एका कार्यक्रमाला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट का घेतली असावी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Devendra Fadnavis meet Raj Thackeray

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी महायुतीवर टीका करत विधानसभेच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशातच आता फडणवीसांनी ठाकरेंची भेट घेतली आहे. फडणवीस महापालिका (Municipal elections) निवडणुका डोळ्यापुढे ठेवून त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी गेले का याचीही चर्चा सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

महत्त्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis हे ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या भेटीचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now