Amit Thackeray । आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महत्त्वाचे म्हणजे काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालावरून महायुतीवर निशाणा साधला होता.
अशातच आता या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर फडणवीस आणि ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आहे. आगामी निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षांची पुन्हा युती होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या (MLA appointed by Governor) नियुक्तीचा मार्ग मोकळा असून या यादीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी फडणवीस-ठाकरे भेट झाल्याची चर्चा सुरु आहे.
Amit Thackeray will become an MLA from BJP quota
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी या भेटीबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. परंतु, त्यांच्यात जवळपास सव्वा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अशातच आता ते भाजप (BJP) कोट्यातून आमदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :