Share

Pankaja Munde नवीन पक्ष काढणार का? छगन भुजबळांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले…

by MHD
Chhagan Bhujbal on Pankaja Munde

Pankaja Munde । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केले तर एक वेगळा पक्ष उभा राहील, असे वक्तव्य राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केले आहे.

“मी उपमुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे दिल्लीत उपनेते होते. एक दिवस ते माझ्याकडे आले होते. तुम्ही मी, आठवले आणि गणपत देशमुख आपण एकत्र येऊन आपण एक वेगळा पक्ष काढू असे ते मला म्हणाले होते. पण त्यांना मी सांगितले की मी तयार आहे. आपल्याला पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मी ओबीसीच्या मुद्यांवर शिवसेनेतून बाहेर पडलो. पण पुढे काहीच झाले नाही,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की, “जरी पंकजा मुंडे बोलत असल्या तरी एका समाजावर पक्ष काढता येत नाही. त्यामध्ये यश मिळवणं, हे कितपत यशदायी आहे, याची मला कल्पना नाही. मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्याचा अर्थ त्या लगेच पक्ष काढतीलच असे नाही,” असाही दावा भुजबळ यांनी केला.

Chhagan Bhujbal statement on Pankaja Munde

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या विधानावरून पंकजा मुंडे या लगेचच नवीन पक्ष काढणार नाही, हे काही अंशी स्पष्ट झाले आहेत. तरीही पंकजा मुंडे भाजपमधून (BJP) बाहेर पडत स्वबळावर नवीन पक्षाची स्थापना करणार का? हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. जरी पंकजा मुंडे यांनी पक्ष काढला तर त्यांना पक्षाच्या आणि स्वतःच्या राजकीय अस्तिवासाठी महायुतीविरुद्ध उभे राहावे लागू शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केले तर एक वेगळा पक्ष उभा राहील, असे वक्तव्य काल Pankaja Munde यांनी केले होते. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now