Share

Suresh Dhas यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी दाखल होणार? राज्यातही फिरू देणार नाही, थेट फडणवीसांकडेच केली मागणी

Suresh Dhas यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. यामुळे सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

by MHD

Published On: 

Bhim Army's demand to register atrocity against Suresh Dhas in Somnath Suryavanshi Death case

Suresh Dhas । भाजप आमदार सुरेश धस हे कायद्याच्या कचाटीत अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही, असे धस यांनी केले होते. हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे.

काल सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढला होता. पण हा मार्च पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि सुरेश धस यांनी मध्यस्थी करून थांबवला. यावरून त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे.

याप्रकरणात भीम आर्मीने (Bhim Army) देखील धस यांच्यावर निशाणा साधला आहे. “सुरेश धस यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. या आमदाराने आमचा लॉंग मार्च चिरडण्याचे काम केले आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे (Ashok Kamble) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

पुढे ते म्हणाले की, “सुरेश धस तुम्ही ज्या ठिकाणी भेटाल, त्या ठिकाणी तुम्हाला आंबेडकरी समाज सोडणार नाही. जोपर्यंत धस महाराष्ट्राची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा देखील अशोक कांबळे यांनी दिला आहे.

Ashok Kamble on Suresh Dhas

अशोक कांबळे यांच्या निर्णयामुळे सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होणार का? आणि सुरेश धस याप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही