🕒 1 min read
Pankaja Munde । मंत्री पंकजा मुंडे यांनी काल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केले तर एक वेगळा पक्ष उभा राहील, असे वक्तव्य होते. यावरून पंकजा मुंडे भाजपला (BJP) रामराम ठोकत नवीन पक्ष काढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. “मी कोणत्या गुंडाला घाबरत नाही. मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. दिल्लीत नरेंद्रजी मोदी (Narendra Modi) आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री आहेत. मी स्वतः मंत्री असताना मी नवीन पक्ष का काढेल?”, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
“जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहीन. ज्यावेळी लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळी मी घरच्या गादीवर बसेल. मला मंत्री झाले काय नाही झाले काय, काही फरक पडत नाही. इतके प्रेम तुम्ही करता,” असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.
Pankaja Munde on New Party
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून त्या नवीन पक्ष काढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंकजा मुंडे भाजप पक्ष सोडून नवीन पक्ष काढणार नसल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे विरोधकांचे तोंडदेखील बंद झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Suresh Dhas यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी दाखल होणार? राज्यातही फिरू देणार नाही, थेट फडणवीसांकडेच केली मागणी
- प्रसिद्ध युट्युबर Ranveer Allahabadia वर ‘त्या’ वक्तव्यामुळे होणार कारवाई? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले..
- Pankaja Munde नवीन पक्ष काढणार का? छगन भुजबळांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











