Share

फडणवीस आज घेणार धनंजय मुंडेंचा राजीनामा? Anjali Damania यांचा दावा

by MHD
Anjali Damania statement about Resignation of Dhananjay Munde

Anjali Damania । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरीही देशमुखांना अजूनही न्याय मिळाला नाही. नुकतेच त्यांच्या हत्येदिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी थेट पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. “हे फुटेज तीन महिने जुने असल्याचे पाहायला मिळत आहे. यात एकीकडे आरोपी गाडीतून उतरून पळून जाताना दिसत आहेत तर पुढे पोलिसांचा फौजफाटा असून त्यांनी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी टीप तर दिली नाही ना? असा संशय अंजली दमानिया यांनी केला आहे.

तसेच अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले आहे. “या प्रकरणात पोलिसांवर कारवाई व्हावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यासंदर्भात मी अनेक पुरावे दिले आहेत. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंडे यांच्या चौकशीची घोषणा केली जाईल आणि त्यांचा राजीनामा घेतला जाईल,” असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

Anjali Damania on Dhananjay Munde Resignation

अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या दाव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जर देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असेल. त्यामुळे फडणवीसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा करून त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असा दावा Anjali Damania यांनी केला आहे.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now