Share

लाडकी बहीण योजना बंद होणार? Aditya Thackeray यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

by MHD
Aditya Thackeray statement on Ladki Bahin Yojana

Aditya Thackeray । विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) राज्य सरकारने लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. परंतु, या योजनेवरून सरकारने आक्रमक भूमिका घेत अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

“एव्हीएमचा घोळ लपवायला महायुती सरकारने सगळ्या योजना आणल्या आहेत. या सरकारकडून महानगरपालिका निवडणुक पार पडल्या की लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल. फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर तिर्थयात्रा योजना, शिवभोजनसह अनेक योजना सरकार बंद करू शकते,” असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

शालेय पोषण आहारातून अंडी वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावरून देखील ठाकरेंनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “राजकीय नेत्यांच्या साखरकारखान्याची थकबाकी भरायला सरकारकडे पैसे आहेत. पण शाळेतील मुलांसाठी सरकारकडे पैसे नाहीत का?” असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Aditya Thackeray on Ladki Bahin Yojana

पुढे ते म्हणाले की, “तुम्ही कितीही आम्हाला पाडायचा किंवा फोडायचा प्रयत्न करा, पण आम्ही महाराष्ट्रासाठी लढणार आहे. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करत नाही. जो देश, संविधान आणि जपेल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ,” असे सूचक वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेली लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही? याबाबत Aditya Thackeray यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now