🕒 1 min read
Mahadev Munde । मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला (Mahadev Munde murder case) तब्बल 15 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही याप्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही.
त्यामुळे आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आज त्या पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांची भेट घेण्यासाठी दुपारी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली आहे.
“पोलीस प्रशासनावर माझा विश्वास राहिला नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला न्याय मिळवून द्यावा. मी पोलिसांना आठ दिवसाचा वेळ देणार असून या दिवसांमध्ये आरोपी अटक झाले नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे,” असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे.
Dnyaneshwari Munde on Mahadev Munde murder case
पुढे त्या म्हणाल्या की, उपोषण केल्यानंतर एक तर न्याय द्या किंवा माझ्या कुटुंबाला संपवून टाका. पंकजा मुंडे यांना आम्ही खूप मानतो. परंतु, ही घटना घडल्यानंतर पंकजा मुंडे आम्हाला एकदाही भेटायला आल्या नाहीत,” अशी खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बोलून दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या :
- संतोष देशमुखांना मारल्यानंतर आरोपींना टीप देणारा पोलीस कोण? Dhananjay Deshmukh यांचा सवाल
- Chhagan Bhujbal यांचे संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “हिमालयात खूप….”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












