Share

संतोष देशमुखांना मारल्यानंतर आरोपींना टीप देणारा पोलीस कोण? Dhananjay Deshmukh यांचा सवाल

संतोष देशमुख यांची हत्या केल्याच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. याप्रकरणी आता संतोष देशमुख यांचे भाऊ Dhananjay Deshmukh यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

by MHD

Published On: 

Dhananjay Deshmukh reacts to CCTV footage the day of Santosh Deshmukh murder case

Dhananjay Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) दोन महिने उलटून गेली आहेत. तरीही त्यांना न्याय मिळाला नसून यातील एक आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) फरार आहे. दरम्यान, देशमुखांना न्याय मिळाला नसल्याने राज्याचे वातावरण तापले आहे.

नुकतेच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या केल्याच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये आरोपी हत्या केल्यांनतर गाडी सोडून पळून जात आहेत. यावरून पोलिसांच्या कार्यक्षमेतवर सवाल उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“संतोष देशमुख यांचे मारेकरी भर रस्त्यात गाडी लावून पळून गेले. यावेळी हाकेच्या अंतरावर पोलीस होते. त्यांचा पाठलाग पोलीस करत होते. मग ते आरोपी का सापडले नाहीत? पोलिसांच्या अभयामुळेच आरोपी मोकाट आहेत. पुढे पोलीस आहेत याची टीप आरोपींना कोणी दिली होती?” असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Dhananjay Deshmukh reacts on CCTV footage of Santosh Deshmukh murder case

पुढे ते म्हणाले की, “सीआयडी आणि एसआयटीकडे दिलेला तपास व्यवस्थित सुरु आहे. पण सुरुवातीच्या केलेल्या चार-पाच दिवसाच्या तपासावर खूप मोठी शंका आहे. पुढे पोलीस आहेत याची टीप कोणत्या पोलिसाने फोन करून दिली. याचा शोध घेतला पाहिजे,” अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही