Share

Dhananjay Munde यांचे समर्थक कैलास फडवर गुन्हा दाखल

The police have registered a FIR against Kailas Phad, a supporter of Dhananjay Munde

by MHD

Published On: 

Case filed against Dhananjay Munde supporter Kailas Phad

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आता त्यांच्या एका समर्थकावर कारवाई करण्यात आली आहे.

कैलास फड (Kailas Phad) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परळी मतदारसंघात शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) यांनी धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढवली होती. मतदानादिवशीच देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव (Madhav Jadhav) यांना कैलास फड आणि त्याच्या साथीदाराकडून मारहाण करण्यात आली होती.

मारहाणीनंतर जाधव यांनी पोस्टाद्वारे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आता कैलास फडवर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास इतका वेळ का लावला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली आहे.

Case registered against Dhananjay Munde supporter Kailash Phad

अंजली दमानिया X वर लिहितात, “अखेर 82 दिवसानंतर गुन्हा दाखल! कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल. विधानसभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाला हे आता स्पष्ट झाले आहे. इलेक्शन कमिशनकडे असे 20 ते 25 तक्रारीचे वीडियो आहेत. त्यातील प्रत्येक वीडियोवर कारवाई करा. परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल. एसपी नवनीत कावत यांचे आभार,” असे दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install