Aaditya Thackeray । नवी दिल्ली येथे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सत्कार झाला. परंतु, या सत्कारावरून आघाडीत नवीन वादाला तोंड फुटले. शरद पवारांवर ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे. महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांवर केलेल्या टीकेला भाजपने (BJP) देखील प्रत्युत्तर दिले आहे.
काल रात्री आमदार आदित्य ठाकरे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. यावरून आता भाजपच्या आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट करत सडकून टीका केली आहे.
Chitra Wagh comment on Aaditya Thackeray and Rahul Gandhi meet
चित्र वाघ X वर लिहितात, “ज्यांच्या आजोबांना नेते ‘मातोश्री’वर भेटायला यायचे, त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय..! मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का..? संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात, पण आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का? की यावरही काहीतरी चमत्कारिक स्पष्टीकरण येणार का?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
“आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत! महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा..? आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे!” असा सल्लाही चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी जहरी टीका केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यावर आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :