Jio Recharge । भारतात Jio च्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणि शानदार धमाकेदार ऑफर घेऊन येत असते. यामुळे ग्राहकांमध्येही मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukhesh Ambani) यांनी जिओ (Reliance Jio) लॉन्च केल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात नवीन क्रांती झाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अशातच आता कंपनीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जिओ व्हाऊचरच्या माध्यमातून रिचार्ज करण्यात येणाऱ्या दोन प्लॅनमध्ये बदल करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या दोन सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये म्हणजेच 19 रुपये आणि 29 रुपये किंमत असणाऱ्या या प्लॅनच्या व्हॅलिडिटीमध्ये बदल केला आहे.
ग्राहकांना आता 19 रुपयांच्या व्हाऊचर प्लॅनवर फक्त एक दिवस तर 29 रुपये व्हाऊचरची व्हॅलिडीटी दोन दिवस मिळणार आहे. यापूर्वी या दोन प्लॅनची व्हॅलिडीटी एक्टीव्ह प्लॅनपर्यंत होती. म्हणजे जिओचा दोन महिन्यांचा प्लॅन युजरने घेतला असल्यास त्याने व्हाउचर डेटा प्लॅन 19 किंवा 29 रुपये घेतला तर प्लॅन संपेपर्यंत म्हणजे दोन महिने त्याची व्हॅलिडीटी होती. परंतु आता एक आणि दोन दिवस ही व्हॅलिडीटी मिळत आहे.
Jio Recharge Plan Validity Changes
दरम्यान, कंपनीने नुकताच अनलिमिटेड डेटा प्लॅन लॉन्च केला असून ग्राहकांना 601 रुपयांसोबत वर्षभर 5जी नेटवर्कची अनलिमिटेड डेटा सुविधा मिळणार आहे. यांमध्ये 12 अपग्रेड व्हाऊचर मिळणार आहे. ते तुम्हाला दर महिन्याला एक, एक रिडीम करता येईल. प्रत्येक व्हाउचरची मर्यादा 30 दिवसांची असेल.
महत्त्वाच्या बातम्या :