Santosh Deshmukh । बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) केज पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अजूनही देशमुखांना न्याय मिळाला नाही.
आतापर्यंत या हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेपेक्षा जास्त जणांची चौकशी केली आहे. आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, आज या हत्या प्रकरणाची बीड न्यायालयात दुसरी सुनावणी होणार आहे. यावेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) उपस्थित राहणार आहे. सुनावणीचा आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण पहिल्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी आरोपपत्रातील माहितीची मागणी केली होती.
तसेच या प्रकरणातील डिजीटल पुरावे, व्हिडीओ, सीडीआर, ऑडिओ कॉल याची मागणी केली होती. 26 मार्चपर्यंत सरकारी वकिलांनी मुदत देण्याची मागणी केली होती. खंडणी प्रकरणतील आरोपी ज्ञानेश्वर मुळे याच्याबाबत काही आक्षेप असल्यास कोर्टात लेखी मत सादर करण्याची सूचना कोर्टाकडून करण्यात आली आहे.
Second hearing in Santosh Deshmukh murder case to be held today
आरोपीच्या वकिलांनी कोर्टात अर्जाद्वारे सरकारी पक्षाच्या वकिलांकडून काही कागदपत्रांची मागणी केली आहे. तसेच न्यायाधीशांनी तो अर्ज सरकारी वकिलांकडे देत कागदपत्राची पूर्तता करण्याचे आदेश दिले असल्याने या कागदपत्रांच्या आधारे आरोपींचा होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :