Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. तरीही देशमुखांना न्याय मिळाला नाही. अशातच याप्रकरणाची काल दुसरी सुनावणी पार पडली.
अशातच आता या हत्या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्यासह इतर तीन आरोपींकडून हत्येची कबुली देण्यात आली आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.
सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार हे एसआयटीच्या ताब्यात असून त्यांनी आपण संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. “संतोष देशमुख यांचे अगोदर अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांची हत्या केली,” अशी कबुली सुदर्शन घुले याने दिली.
“आमचा मित्र प्रतिक घुले याचा वाढदिवस असून आम्हाला संतोष देशमुख यांच्यासह गावकऱ्यांनी मारहाण केली होती. तो व्हिडीओ व्हायरल केल्याने याचा राग मनात होता. खंडणीत देशमुख अडथळा ठरत होते,” असे सुदर्शन घुले म्हणाला.
Sudarshan Ghule Confession
अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढलेला व्हिडीओ पोलिसांनी दाखवताच सुदर्शन घुले याने आपला गुन्हा कबुल केला. तसेच त्याने खंडणीची मागणी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केली असल्याचेही स्पष्ट केले आहे. यामुळे वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या अडचणी वाढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :