Share

“संभाजीराजे छत्रपतींवर मकोका लावा आणि जेलमध्ये टाका,” Prakash Ambedkar यांची आक्रमक मागणी

by MHD
Prakash Ambedkar criticizing Sambhaji Raje Chhatrapati

Prakash Ambedkar । राज्यात सध्या ‘वाघ्या’ कुत्र्याच्या समाधीच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून हटवावे, अशी मागणी केली आहे.

यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना सरळ उचलून मकोका लावा आणि जेलमध्ये टाका. देशाच्या कायद्याच्या विरोधात भुमिका घेण्याऱ्यांचे लांगूलचालन करणे उचित नाही,” असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले आहे.

“संभाजीराजे छत्रपती हे राजर्षी शाहूंचे पणतू आहेत म्हणून मला त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही असे नाही. उद्या मी देखील कायदा विरोधी कृत्य केले तर मला ही जेलमध्ये टाकले पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “ज्या भाजपचे हात मुस्लिमांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांच्याकडून सौगात ए मोदी स्विकारावा का हा विचार मौलवींनी करायला पाहिजे. हेच मौलवी निवडणुकीच्या वेळी फतवे काढतात ना? मग तुमच्या 18 टक्के समाजाला नाकारणाऱ्यांकडून भेट स्विकारावी का?,” असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला.

Prakash Ambedkar on Devendra Fadnavis and Sambhajiraje Chhatrapati

दरम्यान, वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिंमत दाखवावी असे आवाहन केले आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस आणि संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Prakash Ambedkar has directly targeted Sambhaji Raje Chhatrapati on the issue of the waghya statue.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now