Share

“वाल्मिक कराडला वाचविण्यासाठी इतरांना…”; Bajrang Sonawane यांचा मोठा दावा

by MHD
Bajrang Sonawane target Walmik Karad

Bajrang Sonawane । आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी आपणच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामुळे या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) वेगळे वळण लागले आहे. यावर आता खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देऊन या प्रकरणाचा शेवट करावा. याप्रकरणी ज्यांनी पैसे दिले, गाड्या दिल्या, त्यांना सहआरोपी करा. यात काही पोलिसांचा समावेश असून त्यांनादेखील सहआरोपी करा,” अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी यावेळी केली.

“ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी मी सांगितले होते की, संतोष देशमुख हत्येमागे कट आहे. खंडणी मागितल्यावर केजमध्ये वाल्मिक कराड (Walmik Karad) सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलिसांसमोर आरोपींची कबुली येण्यासाठी १०५ दिवस लागले. देर है लेकीन अंधेर नही,” असे बजरंग सोनावणे म्हणाले.

“कराडच्या सर्वच कंपन्यांची सखोल चौकशी व्हावी. तो निगरगट्ट आहेत. जे लोकं सरेंडर होण्यासाठी प्रयत्न करत होते. कराडला वाचविण्यासाठी इतरांना अडकवण्याचं काम सुरू होते,” असा दावा सोनवणे यांनी केला आहे.

Bajrang Sonawane on Krishna Andhale

तसेच सोनवणे यांनी फरार कृष्णा आंधळे याच्यावरूनही पोलिसांवर निशाणा साधला. “आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) पळवाट काढतोय यात पोलीसांचे अपयश म्हणायला पाहिजे का? प्रयागराजला खोक्या भोसले पकडला, पण कृष्णा आंधळे का सापडला नाही?” असा संतप्त सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Bajrang Sonawane has reacted to the three accused in the Santosh Deshmukh murder case confessing to his kidnapping and murder.

Marathi News Crime Maharashtra

Join WhatsApp

Join Now