Share

Disha Salian मृत्यू प्रकरणात होणार मोठा खुलासा? वकिलांनी केली मोठी मागणी

by MHD
Nilesh Ojha demand in Disha Salian death case

Disha Salian । अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण (Disha Salian death case) पाच वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून केली आहे.

अशातच आता त्यांचे वकील निलेश ओझा (Nilesh Ojha) यांनी आणखी एक मोठी मागणी केली आहे. “दिशा सालियनचा पोस्ट मार्टम रिपोर्ट चुकीचा बनवला होता. सचिन वाझेने मनसुख हिरेन प्रकरणासारखे हे प्रकरण फिरवले आहे,” असा दावा निलेश ओझा यांनी केला आहे.

“हा पोस्टमार्टम रिपोर्ट बाजूला ठेवून इतर जे साक्षी पुरावे आमच्याकडे आहेत. त्याचा विचार करावा. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करावी. आमच्यासोबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), डिनो मोरिया, सचिन वाझे यांचीही नार्को टेस्ट करावी,” अशी मागणी ओझा यांनी केली.

Nilesh Ojha on Disha Salian death case

“दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास अपघाती मृत्यूच्या कलमाखाली न करता गँग रेपचे कलम लावून गुन्हा दाखल करून करावा. उद्याच ताबडतोब या प्रकरणाचे सिन रीक्रिएशन करावे. यामुळे याप्रकरणातील अनेक गोष्टी समोर येतील,” असा दावा ओझा यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या :

Lawyer Nilesh Ojha has now made some more big demands in the Disha Salian death case.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now