Santosh Deshmukh । सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची (Santosh Deshmukh murder case) कोर्टात दुसरी महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी या हत्येतील तीन आरोपींनी आपणच देशमुखांना मारले असल्याचे कबुल केले. यावर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
संतोष देशमुख यांना मारहाण केलेली शस्त्र कोठे आहेत? याबद्दल प्रतिक घुलेने (Pratik Ghule) मोठा खुलासा केला आहे. संतोष देशमुखांना जेथे मारहाण केली त्या जवळ असणाऱ्या एका काटेरी झुडपात बांबूची जाड काठी लपवून ठेवली होती.
देशमुखांना आम्ही माऊली कारखाना ते टाकळी रोडवर विविध हत्याराने मारून त्यांची हत्या केली होती, अशी कबुली प्रतिक घुलेने दिली. अशातच सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनीदेखील हत्येची कबुली दिली आहे.
या तिन्ही आरोपींनी दिलेल्या कबुलीमुळे आधीच अडचणीत असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. याप्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत मोठी मागणी केली आहे.
Dhananjay Deshmukh demand in Santosh Deshmukh murder case
“आरोपी कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करा. तसेच सर्व आरोपींना फाशी द्या. जोपर्यंत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही समाधानी म्हणणे घाईचे होईल,” अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :